Sameer Panditrao
निजामशाही, आदिलशाहीच्या ताब्यात असलेला हा गड आधी १६७४ साली मराठयांनी जिंकुन घेतला होता.
सातारा जिल्हातील वाईजवळ हा गड आहे.
तर हा केंजळगड घेराकेळंज या नावानेही ओळखला जातो.
गडाच्या पायथ्याला कोर्ले हे गाव आहे.
एका कातळात खोदलेल्या खोदीव पायऱ्या केंजळगडाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. याशिवाय गडावर पाण्याचे टाके, दरवाजाचे अवशेष, काही चौथरे पाहता येतात.
गडावर केळंजाई देवीचे मंदिर आहे.
पुण्यातून हा किल्ला ८० किमी अंतरावर आहे.