गोमन्तक डिजिटल टीम
जवळपास ४७१ किमी लांबीचा हा मार्ग मुंबईवरून पनवेल, महाड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली करत गोव्यापर्यंत पोहोचतो.
गणेश चतुर्थीवेळी गोवा आणि कोकणातले चाकरमानी गावी जातात आणि या मार्गावर खूप गर्दी होते.
खराब रस्ता आणि खड्डे सुरु झाले की या महामार्गावरील समस्यांची चर्चा सुरु होते.
हा महामार्ग वापरात आल्यापासून प्रत्येक गणपती उत्सवापूर्वी या रस्त्याच्या दर्जाबाबत चर्चा होते, अनेक आश्वासने मिळतात.
राजकीय नेत्यांचे दौरे होतात, तात्पुरती मलमपट्टी म्हणून रस्त्यांचे दुरुस्ती काम सुरु होते.
गणेशोत्सव संपला की परत रस्ते खड्ड्यांनी भरतात आणि महामार्गाचा विषय बासनात गुंडाळला जातो.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच या महामार्गाची पाहणी केली.
पूर्णपणे दुरुस्त होऊन, संपूर्ण क्षमतेने हा महामार्ग कधी सुरु होतोय याची नागरिक वाट पाहत आहेत.