गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा होतो.
इथल्या गणेश उत्सवात माटोळीला महत्वाचे स्थान आहे. फळे, फुले, पाने यांचा वापर करून माटोळी बनवली जाते.
गणेशोत्सवाच्या आधी बऱ्याच ठिकाणी माटोळी बाजार भरतात. यातले काही बाजार अनेक वर्षे जुने आहेत.
बाणस्तारीचा पारंपरिक माटोळी बाजाराला शेकडो वर्षांची परंपरा आहे.
काजूबागांनी वेढलेले बाणस्तरी गाव कुंडई औद्योगिक वसाहतीपासून अगदी जवळ आहे.
आंसाळे, बनकीची फळे, त्रिफळ, सुपारी, भिल्ल, माडाची फळे, कणग्यांची कंद, चमेलीचे गजरे, रान केळी माटोळीसाठी लागणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी इथे बघता येतात.
लिंबू, मोसंबी, अननस अशी नेहमीची फळे सुद्धा माटोळी मध्ये विक्री साठी ठेवली होती
निसर्गाशी नाळ जोडलेली ही आरास गणरायाच्या पूजेतील मनमोहक भाग आहे.