Sameer Panditrao
मुंबई फिरण्यासाठी लोकांना आवडतेच पण इथले एक अद्भुत ठिकाण लोकांच्या विस्मरणात गेले आहे.
गिल्बर्ट हिल ही मुंबईतील अंधेरी येथे असलेली सुमारे ६.६ कोटी वर्षे जुनी एक बेसाल्ट खडकाची टेकडी आहे.
ही टेकडी जगातल्या अशा तीन ठिकाणांपैकी एक आहे जिथे ज्वालामुखीच्या लाव्हापासून तयार झालेले बेसॉल्टचे उभे स्तंभ आढळतात
गिल्बर्ट हिलला १९५२ मध्ये राष्ट्रीय उद्यान आणि २००७ मध्ये वारसा स्थळ (heritage site) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
एक उंच जिना गिल्बर्ट हिलच्या शिखरावर जातो, जो थेट खडक कापून तयार करण्यात आलेला आहे.
वर दोन लहान मंदिरे दिसतात: गावदेवी मंदिर आणि दुर्गा माता मंदिर.
घनरूप झालेला लाव्हारस गिल्बर्ट हिल म्हणून आपल्यासमोर उभा आहे.