Manish Jadhav
नवीन वर्षाच्या आधी मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जिओने आपल्या यूजर्संना मोठा धक्का दिला आहे.
कंपनीने आपल्या सर्वात स्वस्त 19 आणि 29 रुपयांच्या जिओ व्हाउचर प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली आहे. जी पूर्वी व्हॅलिडिटी एक्टिव प्लॅनच्या व्हॅलिडिटीपर्यंत होती. मात्र कंपनीने ती व्हॅलिडिटी 1 दिवस आणि 2 दिवसांपर्यंत कमी केली आहे.
Jio च्या नवीन निर्णयानंतर, आता यूजर्संना 19 रुपयांच्या Jio व्हाउचर प्लॅनवर फक्त 1 दिवसाची व्हॅलिडिटी मिळेल आणि 29 रुपयांच्या व्हाउचरची व्हॅलिडिटी 2 दिवस असेल.
यापूर्वी, या दोन्ही प्लॅनची व्हॅलिडिटी एक्टिव प्लॅनच्या व्हॅलिडिटीपर्यंत होती. उदाहरणार्थ, जर तुम्ही Jio चा दोन महिन्यांचा रिचार्ज प्लॅन खरेदी केला असेल आणि त्यासोबत तुम्ही Jio व्हाउचरसह डेटा प्लॅनची सदस्यता घेतली असेल, तर तुमच्या व्हाउचरची व्हॅलिडिटी एक्टिव प्लॅनच्या व्हॅलिडिटीपर्यंत होती. मात्र आता कंपनीने त्यात बदल करत व्हॅलिडिटी 1 दिवस आणि 2 दिवस केली आहे.
जिओ यूजर्स या डेटा व्हाउचरद्वारे रिचार्ज करतात जेव्हा त्यांची रेग्युलर डेटा लिमिट डेटा पूर्ण होते आणि ते त्यांच्या सोयीनुसार डेटा वापरतात.
कंपनीने यावर्षी 3 जुलैपासून आपले सर्व प्लॅन महाग केले होते, ज्यामध्ये Jio ने 15 रुपयांच्या डेटा व्हाउचरची किंमत 19 रुपये केली होती, तर 25 रुपयांच्या प्लॅनची किंमत 29 रुपये केली होती.
जिओने नुकताच आपला नवीन अनलिमिटेड डेटा प्लान लॉन्च केला आहे. या प्लॅन अंतर्गत यूजर्संना 601 रुपयांमध्ये एका वर्षासाठी 5G नेटवर्कसह अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळेल.