Manmohan Singh: पाकिस्तानात जन्म, फाळणीचं दु:ख सहन केलं...

Manish Jadhav

मनमोहन सिंग यांचं निधन

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.

Manmohan Singh | Dainik Gomantak

प्रकृती स्वास्थ

गुरुवारी (26 डिसेंबर) रात्री त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Manmohan Singh | Dainik Gomantak

शोककळा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला.

Manmohan Singh | Dainik Gomantak

फाळणीचं दु:ख

भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणेच मनमोहन सिंग यांनाही देशाच्या फाळणीचे दुःख सहन करावे लागले होते. तेही पाकिस्तानातून आपल्या कुटुंबासह सीमा ओलांडून पंजाबमधील अमृतसर येथे आले होते.

Manmohan Singh | Dainik Gomantak

जन्म

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म पाकिस्तानचा भाग असलेल्या पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यातील गाह गावात झाला होता.

Manmohan Singh | Dainik Gomantak

पाकिस्तानात चर्चा

2004 मध्ये मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा पाकिस्तानात त्यांची खूप चर्चा झाली होती.

Manmohan Singh | Dainik Gomantak

मनमोहन सिंग यांचं नाव

2007 मध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या तत्कालीन सरकारने गाह गावाला मॉडेल व्हिलेज बनवण्याची घोषणा केली होती. इतकेच नाही तर आजही गाह गावात मुलांची एक सरकारी शाळा आहे, ज्याला तिथल्या सरकारने मनमोहन सिंग यांचे नाव दिले आहे.

Manmohan Singh | Dainik Gomantak
आणखी बघा