Manish Jadhav
मुघल घराण्याचा तिसरा शासक अकबर हा भारतातील महान सम्राटांपैकी एक होता.
'प्रजाहितदक्ष राजा' अशी अकबराची ओळख होती. त्याच्या शासनकाळात जनता खूप खूश होती असे सांगितले जाते.
मात्र फार कमी लोकांना माहिती आहे की, अकबर एका विचित्र आजाराने ग्रस्त होता. अबुल फजलच्या ऐन-ए-अकबरीमध्ये याचा उल्लेख आहे.
अकबरला डिस्लेक्सिया नावाचा आजार होता. त्याला अक्षरे ओळखण्यात अडचण होती.
डिस्लेक्सिया हा एक लर्निंग डिसऑर्डर असून यामध्ये ध्वनी, अक्षरे आणि शब्द ओळखण्यात अडचण येते. अकबर कधीही वाचायला शिकला नाही.
अकबर जरी निरक्षर असला तरी तो तुर्की आणि पर्शियन भाषांमध्ये पारंगत होता.