Most Beautiful Villages: गडद जंगलं, हिरवेगार डोंगर...भारतातील 5 सुंदर गावं, नक्की भेट द्या

Sameer Amunekar

भारत म्हणजे विविधतेने नटलेला देश, आणि इथल्या ग्रामीण भागांमध्ये आजही नैसर्गिक सौंदर्य, शांतता आणि संस्कृतीचे खरे रूप जपलेले आहे. भारतातील पाच सर्वात सुंदर गावं या वेबस्टोरीच्या माध्यमातून सांगणार आहोत.

Most Beautiful Villages | Dainik Gomantak

मावलिननोंग, मेघालय

'एशियातील सर्वात स्वच्छ गाव' म्हणून या गावची ओळख आहे. घनदाट जंगलांनी वेढलेलं, स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव म्हणजे एक नंदनवनच.

Most Beautiful Villages | Dainik Gomantak

खजियार, हिमाचल प्रदेश

भारताचं ‘मिनी स्वित्झर्लंड’ असं या गावाला म्हटलं जातं. पाइन वृक्षांनी वेढलेले हिरवे गालिचे, शांत तलाव आणि हिमाच्छादित डोंगर येथे पाहायला मिळतात.

Most Beautiful Villages | Dainik Gomantak

लमायुरू, लडाख

या गावाला 'मूनलँड' म्हणतात. येथील खडकाळ भूभाग, जुने बौद्ध मठ आणि निरभ्र आकाश लमायुरूचे सौंदर्य हे पृथ्वीवरील चंद्रावर असल्यासारखं वाटतं.

Most Beautiful Villages | Dainik Gomantak

पाटन, गुजरात

पुरातत्व, वास्तुशिल्प आणि पारंपरिक कारागिरी यांची त्रिवेणी इथे पाहायला मिळते. हे गाव ऐतिहासिक वारसा आणि शांत जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे.

Most Beautiful Villages | Dainik Gomantak

गोकर्ण, कर्नाटक

गोकर्ण हे गाव पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात आध्यात्मिक अनुभव देतं. इथली ओंम बीच, कुडली बीच हे खूप प्रसिद्ध आहेत.

Most Beautiful Villages | Dainik Gomantak
Famous Hill Station | Dainik Gomantak
येथे क्लिक करा