गोमन्तक डिजिटल टीम
काही पदार्थ हे केवळ गोव्यात खाण्यात मजा असते. गोव्यातील वातावरण, मसाले आणि आपुलकीच्या स्वाद त्यात उतरलेला असतो.
या पदार्थांपैकी एक म्हणजे मुगाच्या गाठी किंवा मुगां गाठी. गोव्यातील अनेक घरांमध्ये खास सण-समारंभावेळी मुगाच्या गाठी बनवल्या जातात.
कांदा आणि लसणीशिवाय सुद्धा एखादा पदार्थ उत्तम लागू शकतो हे मुगाच्या गाठी खाऊन बघिल्यानंतर लक्ष्यात येतं.
पुरी, चपाती किंवा भातासोबत हा पदार्थ खाता येतो. मुळातच तिखट असलेला पदार्थ तिखटप्रेमींसाठी मेजवानीच आहे.
कोंब आलेले मूग हे आरोग्यवर्धक आहेत. यामधून शरीराला प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळायला मदत होते.
गणेशचतुर्थीच्या काळात गोव्यात बऱ्यापैकी घरांमध्ये मुगाच्या गाठी नक्कीच बनल्या असतील.
आता येणाऱ्या पिरूपक्षात गोव्यात म्हाळ महिना म्हणून पितरांसाठी विविध जिन्नस बनवले जातात आणि यात अनेकवेळा मुगाच्या गाठींचा समावेश असतो.