Pranali Kodre
भारतात 22 जानेवारी 2024 या दिवसाची कोट्यवधी जनता उत्सुकतेने वाट पाहात आहे. कारण याच दिवशी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा रंगणार आहे.
या सोहळ्यासह देशभरातील राजकीय नेते, बिझनेसमन, सिनेस्टार, खेळाडू अशा अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे.
दरम्यान आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार कोणकोणत्या खेळाडूंना निमंत्रण मिळाले आहे हे जाणून घेऊ.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीलाही राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
भारताचा विश्वविजेता कर्णधार एमएस धोनीलाही रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूलाही रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रालाही राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही अयोध्येतील या ऐतिहासिक सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
भारताचा फिरकीपटू आर अश्विन यालाही रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यालाही अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरलाही राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.