Pranali Kodre
भारतात चालू असलेल्या रणजी ट्रॉफी 2023-24 हंगामात सौराष्ट्राकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराने विदर्भाविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात 43 आणि दुसऱ्या डावात 66 धावा केल्या.
यासह पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत 20 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
पुजारा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारा भारताचा फक्त चौथाच खेळाडू ठरला आहे. (आकेडेवारी 21 जानेवारी 2024 पर्यंत)
पुजाराच्या आता 260 प्रथम श्रेणी सामन्यात 50 पेक्षा जास्त सरासरीने 20013 धावा झाल्या आहेत. यामध्ये 61 शतकांचा आणि 78 अर्धशतकांचा समावेश आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये अव्वल क्रमांकावर सुनील गावसकर आहेत. त्यांनी 348 सामन्यांत 81 शतके आणि 105 अर्धशतकांसह 25834 धावा केल्या आहेत.
सचिन तेंडुलकर 25396 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 310 सामने खेळले असून 81 शतके आणि 116 अर्धशतके केली आहेत.
राहुल द्रविड 23794 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 298 सामन्यांत खेळताना 68 शतके आणि 117 अर्धशतके केली आहेत.