Manish Jadhav
मालदीवचे 'भारतविरोधी' राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सध्या मालदीवमधील परिस्थिती भारत आणि चीनभोवती फिरत आहे.
मालदीवमधील विरोधी पक्षांच्या वक्तव्यावरुन त्यांना भारत समर्थक म्हणता येईल. अलीकडेच मुइज्जू यांनी विरोधकांच्या मान्यतेशिवाय चार खासदारांचा आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला.
मुइज्जू यांच्या या कृतीमुळे संतप्त झालेल्या प्रमुख विरोधी पक्ष आणि संसदेत संख्यात्मकदृष्ट्या सर्वात जास्त संख्याबळ असलेल्या एमडीपीने मुइज्जू यांच्याविरोधात महाभियोग आणण्याची तयारी सुरु केली.
मुइज्जू यांच्या स्वतःच्या पक्षातील अनेक खासदारांनी विरोधी पक्षांना पाठिंबा देण्यास स्वारस्य दाखवले आहे. 42 सदस्यांसह पीपल्स मजलिस (संसद) मधील सर्वात मोठा पक्ष MDP, मोहम्मद मुइज्जू यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी डेमोक्रॅट्ससोबत काम करत आहे.
आउटलेट Sun.mv नुसार, MDP आणि डेमोक्रॅट्सचे मिळून 87 सदस्य असलेल्या मालदीव संसदेत 56 खासदार आहेत. मालदीवच्या संविधानाने राष्ट्रध्याक्षांवर 54 मतांनी महाभियोग चालवण्याची परवानगी दिली आहे.
दुसरीकडे, काही मंत्रिपदाच्या नियुक्त्या नाकारण्याच्या निर्णयाला सत्ताधारी युतीच्या खासदारांनी विरोध केल्यानंतर आणि संसदेची बैठक उधळून लावल्यानंतर अध्यक्ष मुइज्जू यांच्यावर महाभियोग चालवण्याची विरोधकांची हालचाल लक्षात घेण्याजोगी आहे.