Pranali Kodre
वर्ष 2023 आता संपत आले आहेत. या वर्षातील सर्व क्रिकेट संघांचे वनडे सामनेही खेळून झाले आहेत. दरम्यान 2023 मध्ये वनडेत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या 10 संघांबद्दल जाणून घेऊ.
भारतीय संघाने 2023 मध्ये 35 वनडे सामने खेळताना 27 विजय मिळवले. तसेच 7 सामन्यात पराभव स्विकारला, तर 1 सामन्याचा निकाल लागला नाही.
दक्षिण आफ्रिका संघाने 2023 मध्ये 25 वनडे खेळताना 16 विजय मिळवले, तर 9 सामने पराभूत झाले.
श्रीलंका संघाने 2023 मध्ये 31 वनडे सामने खेळताना 16 विजय मिळवले, तर 15 पराभव स्विकारले.
नेपाळ संघाने 2023 मध्ये 22 वनडे सामने खेळताना 15 विजय मिळवले, तर 7 सामन्यात पराभव स्विकारले.
न्यूझीलंडने 2023 मध्ये 33 वनडे सामने खेळले. यातील 15 सामन्यांत विजय मिळवला, तर 17 सामन्यांत पराभव स्विकारला. तसेच 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही.
ऑस्ट्रेलियाने यावर्षी वर्ल्डकप जिंकला. तसेच त्यांनी 2023 वर्षात 22 वनडे सामने खेळताना 14 विजय मिळवले आणि 8 पराभव पाहिले.
पाकिस्तान संघाने 2023 वर्षात 25 वनडे सामन्यांत 14 विजय मिळवले आणि 10 परभव स्विकारले. त्यांचा 1 सामन्याचा निकाल लागला नाही.
बांगलाशने 2023 वर्षात 32 वनडे सामन्यांतील 11 सामन्यांत विजय मिळवला, तसेच १८ सामन्यात पराभव पत्करला. त्याचबरोबर 3 सामन्यांचा निकाल लागला नाही.
इंग्लंड संघाने 2023 वर्षात 24 वनडे सामने खेळताना 11 विजय मिळवले आणि 12 पराभव पाहिले. तसेच एका सामन्याचा निकाल लागला नाही.
वेस्ट इंडिज संघाने 2023 वर्षात 18 वनडे सामने खेळले. त्यांनी 10 विजय मिळवले, तर 7 पराभव स्विकारले आणि 1 सामना बरोबरीत सुटला.