ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पहिल्या फेरीपासूनच खेळाडू होणार मालामाल

Pranali Kodre

ऑस्ट्रेलियन ओपन 2024

ऑस्ट्रेलियन ओपन ही प्रत्येक वर्षी जानेवारीमध्ये खेळली जाणारी प्रतिष्ठीत ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा आहे. 2024 मध्ये ही स्पर्धा 14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे.

Novak Djokovic | X/AustralianOpen

बक्षीसात 13 टक्के वाढ

या स्पर्धेसाठी बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान 2023 पेक्षा 2024 सालच्या बक्षीस रकमेत तब्बल 13 टक्के वाढ करण्यात आली.

Novak Djokovic | X/AustralianOpen

10 मिलियन डॉलरची वाढ

म्हणजेच यंदा एकूण 86.5 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरच्या बक्षीस रकमेची तरतुद करण्यात आली आहे. 2023 च्या तुलनेत 10 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरची वाढ झाली आहे.

Tennis | X/AustralianOpen

विजेत्यांचे बक्षीस

या स्पर्धेत एकेरीत विजय मिळवणाऱ्या पुरुष आणि महिला खेळाडूला 3.150 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर बक्षीस देण्यात येणार आहे, तर महिला आणि पुरुष दुहेरीतील विजयी जोडीला 730,000 ऑस्ट्रेलियन डॉलरचे बक्षीस मिळणार आहे. तसेच मिश्र दुहेरीतील विजेत्यांना 165,000 ऑस्ट्रेलियन डॉलर दिले जाणार आहेत.

Sabalenka Aryna | X/WTA

उपविजेत्यांचे बक्षीस

एकेरीतील उपविजेत्या खेळाडूंना 1,725 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर, तर महिला आणि पुरुष दुहेरीतील उपविजेत्यांना 400,000 ऑस्ट्रेलियन डॉलरचे बक्षीस मिळणार आहे. त्याचबरोबर मिश्र दुहेरीसाठीही उपविजेत्यांना 94,000 ऑस्ट्रेलियन डॉलरचे बक्षीस दिले जाणार आहे.

Sabalenka Aryna - Elena Rybakina | X/WTA

एकेरीतील बक्षीस

इतकेच नाही, तर या स्पर्धेत एकेरीत पहिल्याच फेरीतून बाहेर होणाऱ्या खेळाडूला 120,000 ऑस्ट्रेलियन डॉलर, दुसऱ्या फेरीतून बाहेर होणाऱ्या खेळाडूला 180,000 ऑस्ट्रेलियन डॉलर, तिसऱ्या फेरीतून बाहेर होणाऱ्या खेळाडूला 255,000 ऑस्ट्रेलियन डॉलर, चौथ्या फेरीतून बाहेर होणाऱ्या खेळाडूला 375,000 ऑस्ट्रेलियन डॉलर, उपांत्यपूर्व फेरीसाठी 600,000 ऑस्ट्रेलियन डॉलर, तसेच उपांत्य फेरीसाठी 990,000 ऑस्ट्रेलियन डॉलरचे बक्षीस दिले जाईल.

Novak Djokovic - Stefanos Tsitsipas | X/AustralianOpen

महिला आणि पुरुष दुहेरीतील बक्षीस

महिला आणि पुरुष दुहेरीत पहिल्या फेरीसाठी 36,000 ऑस्ट्रेलियन डॉलर, दुसऱ्या फेरीसाठी 53,000 ऑस्ट्रेलियन डॉलर, तिसऱ्या फेरीसाठी 75,000 ऑस्ट्रेलियन डॉलर, उपांत्यपूर्व फेरीसाठी 128,000 ऑस्ट्रेलियन डॉलर, उपांत्य फेरीसाठी 227,500 ऑस्ट्रेलियन डॉलर बक्षीस असेल.

Australian Open | X/AustralianOpen

मिश्र दुहेरीतील बक्षीस

मिश्र दुहेरीसाठी पहिल्या फेरीसाठी 6,900 ऑस्ट्रेलियन डॉलर, दुसऱ्या फेरीसाठी 13,275 ऑस्ट्रेलियन डॉलर, उपांत्यपूर्व फेरीसाठी 26,500 ऑस्ट्रेलियन डॉलर आणि उपांत्य फेरीसाठी 50,000 ऑस्ट्रेलियन डॉलर बक्षीस दिले जाणार आहे.

Sania Mirza - Rohan Bobanna | X/AustralianOpen

पात्रता फेरी

एवढेच नाही, पात्रता फेरी खेळणाऱ्या खेळाडूनाही बक्षीस दिले जाणार आहे. पहिल्या फेरीतून बाहेर जाणाऱ्याला 31,250 ऑस्ट्रेलियन डॉलर, दुसऱ्या फेरीसाठी 44,100 ऑस्ट्रेलियन डॉलर आणि तिसऱ्या फेरीसाठी 65,000 ऑस्ट्रेलियन डॉलर.

Australian Open | X/AustralianOpen

सेंच्युरियनवर सेंच्युरी करत KL Rahul चा मोठा विश्वविक्रम

KL Rahul | X/BCCI