Pranali Kodre
साल 2023 आता संपत आले असल्याचे या वर्षातील क्रिकेटचे सामने सर्व संघांचे जवळपास खेळून पूर्ण झाले आहेत. त्यामुळे या वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंवर शिक्कामोर्तब झाले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2023 वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या पहिल्या 5 गोलंदाजांमध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत. या वर्षातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या 5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने 2023 वर्षात 35 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 23.74 च्या सरासरीने सर्वाधिक 66 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने 2023 वर्षात 39 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 18.85 च्या सरासरीने 63 विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनेही 2023 वर्षात 23 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 29.77 च्या सरासरीने 63 विकेट्स घेतल्या आहेत.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने 2023 सालात 30 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 27.80 च्या सरासरीने 62 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 2023 वर्षात 34 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 23.78 च्या सरासरीने 60 विकेट्स घेतल्या आहेत.