Pranali Kodre
साल 2023 वर्षातील आता जवळपास सर्व क्रिकेट संघांचे सामने खेळून झाले आहेत. त्यामुळे या वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंवर शिक्कामोर्तब झाले आहे.
2023 वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या पहिल्या 5 फलंदाजांमध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत. या वर्षातील सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
भारताचा सलामीवीर शुभमन गिलने 2023 स्पर्धेत 48 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 46.82 च्या सरासरीने सर्वाधिक 2154 धावा केल्या आहेत. यामध्ये 7 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.
भारताचा फलंदाज विराट कोहलीने 2023 वर्षात 35 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 66.06 च्या सरासरीने 2048 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 8 शतकांचा आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.
न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिचेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2023 वर्षात 50 सामने खेळले असून 6 शतके आणि 9 अर्धशतकांसह आणि 41.41 च्या सरासरीने 1988 धावा केल्या आहेत.
रोहित शर्माने 2023 वर्षात 35 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 48.64 च्या सरासरीने 1800 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेविस हेडने 2023 वर्षात 31 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 43.53 च्या सरासरीने 3 शतके आणि 9 अर्धशतकांसह 1698 धावा केल्या आहेत.