Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाने 2023 मधील सर्व सामने खेळून झाले आहे. भारताने यावर्षात 8 कसोटी सामने या वर्षात खेळले, ज्यातील 3 सामने जिंकले आणि 3 सामने पराभूत झाले, त्याचबरोबर 2 सामने अनिर्णित राहिले.
यावर्षी कसोटीत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची नावेही निश्चित झाली आहेत. 2023 मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
विराटने 2023 मध्ये आठही कसोटी सामन्यात खेळताना 12 डावात 55.91 च्या सरासरीने 2 शतके आणि 2 अर्धशतकांसह 671 धावा केल्या.
रोहित शर्मानेही 2023 मध्ये सर्व 8 कसोटी सामने खेळताना 13 डावात 41.92 च्या सरासरीने 2 शतके आणि 2 अर्धशतकांसह 545 धावा केल्या.
युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल २०२३ मध्ये ३ कसोटी सामना खेळला. त्याने 5 डावात 57.60 च्या सरासरीने 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 288 धावा केल्या.
अष्टपैलू रविंद्र जडेजाने 2023 मध्ये 7 कसोटी सामने खेळले, ज्यातील 9 डावात त्याने 2 अर्धशतकांसह 281 धावा केल्या.
अष्टपैलू अक्षर पटेलने 2023 मध्ये 4 कसोटी सामन्यांतील 5 डावात फलंदाजी करताना 88 च्या सरासरीने 3 अर्धशतकांसह 264 धावा केल्या.