Pranali Kodre
मुंबई इंडियन्सने 15 डिसेंबर 2023 रोजी हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसणार हे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे आता हार्दिक मुंबई इंडियन्सचा 9 वा कर्णधार होण्यास सज्ज आहे. यापूर्वी मुंबईचे नेतृत्व केलेल्या 8 कर्णधारांबद्दल जाणून घेऊ.
हरभजन सिंगने 2008 ते 2012 दरम्यान 30 टी20 सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना 14 विजय आणि 14 पराभव स्विकारले आहेत.
शॉन पोलॉकने 2008 मध्ये 4 टी20 सामन्यांत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले असून 3 विजय आणि 1 पराभव मिळवले आहेत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 2008 ते 2011 दरम्यान 55 टी20 सामन्यांत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आहे. यामधील 32 सामन्यात विजय आणि 23 पराभव स्विकारले आहेत.
ड्वेन ब्रावोने 2010 साली एकाच सामन्यात मुंबई इंडियन्सने नेतृत्व केले होते, ज्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
रिकी पाँटिंगने 2013 साली मुंबई इंडियन्सने 6 टी20 सामन्यांत नेतृत्व केले असून 3 विजय आणि 3 पराभव पाहिले आहेत.
रोहितने 2013 ते 2023 दरम्यान 163 टी20 सामन्यांत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना 91 सामन्यांत विजय मिळवले आणि 68 सामन्यांत पराभव स्विकारले आहेत. तसेच 4 सामने बरोबरीत सुटले आहेत.
पोलार्डने मुंबई इंडियन्सचे 9 सामन्यांत नेतृत्व केले आहे. यातील 5 सामन्यांत विजय आणि 4 सामन्यात पराभव त्याला पत्करावे लागले आहेत.
सूर्यकुमार यादवने 2023 मध्ये एका सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले असून एक विजय मिळवला आहे.