Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघात राजकोटमध्ये 15 ते 18 फेब्रुवारी 2024 दरम्यान कसोटी सामना पार पडला, ज्यात भारताने 434 धावांनी विजय मिळवला.
भारताच्या या विजयात द्विशतक करत यशस्वी जयस्वालने मोलाचे योगदान दिले. त्याने दुसऱ्या डावात 236 चेंडूत नाबाद 214 धावा केल्या.
ही द्विशतकी खेळी करताना त्याने 12 तब्बल षटकार मारले. त्यामुळे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या वसिम आक्रमच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.
वसिम आक्रमने देखील 1996 साली झिम्बाब्वेविरुद्ध पाकिस्तानकडून खेळताना एका डावात 12 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता.
ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने 2003 मध्ये पर्थ कसोटीत झिम्बाब्वेविरुद्ध एका डावात 11 षटकार खेचले होते.
तसेच न्यूझीलंडच्या नॅथन ऍस्टलने इंग्लंडविरुद्ध 2002 साली ख्राईस्टचर्च कसोटीत एका डावात 11 षटकार मारले होते.
ब्रेंडन मॅक्युलमने न्यूझीलंडकडून कसोटीच्या एकाच डावात 11 षटकार मारण्याचा विक्रम दोनवेळा केला आहे. त्याने 2014 सालीच हा पराक्रम केला.
मॅक्युलमने 2014 मध्ये पाकिस्तान विरुद्ध शारजाह कसोटीत आणि श्रीलंकेविरुद्ध ख्राईस्टचर्च कसोटीत डावात 11 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता.
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2016 साली केपटाऊन कसोटीत डावात 11 षटकार मारले होते.
श्रीलंकेच्या कुशल मेंडिसने 2023 मध्ये आयर्लंडविरुद्ध गॉलमध्ये झालेल्या कसोटीत एका डावात 11 षटकार मारण्याचा विक्रम केला होता.