Pranali Kodre
भारत आणि इंग्लंड संघात राजकोटमध्ये 15 ते 18 फेब्रुवारी 2024 दरम्यान कसोटी सामना पार पडला. या कसोटीत भारताने 434 धावांनी विजय मिळवला.
मात्र, या सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात शुभमन गिल 91 धावांवर असताना धावबाद झाला.
त्यामुळे शुभमन गिल नव्वदीत (90 ते 99 धावा) असताना कसोटीमध्ये धावबाद होणारा भारताचा सहावा फलंदाज ठरला.
यापूर्वी सर्वात पहिल्यांदा भारताचे विनू मंकड वेस्ट इंडिजविरुद्ध 1953 साली पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत 96 धावांवर धावबाद झाले होते.
त्यानंतर 1960 साली पाकिस्तानविरुद्ध कानपूर कसोटीत भारताचे एम जयसिम्हा 99 धावांवर धावबाद झाले होते.
साल 1982 मध्ये श्रीलंकेविरुद्ध चेन्नई कसोटीत भारताचे दिलीप वेंगसरकर 90 धावांवर धावबाद झाले होते.
यानंतर 1997 साली भारताचे अजय जडेजा वेस्ट इंडिजविरुद्ध अँटिग्वा कसोटीत 96 धावांवर धावबाद झाले होते.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीही 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध नागपूर कसोटीत 99 धावांवर धावबाद झाला होता.