Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 19 नोव्हेंबर रोजी पार पडला.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्सने पराभव केला.
दरम्यान, या सामन्यानंतर या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली अव्वल क्रमांकावर आहे. त्याने वर्ल्डकप 2023 मध्ये 11 सामन्यांत 95.62 च्या सरासरीने 765 धावा केल्या आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याने 11 सामन्यांत 597 धावा केल्या आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक असून त्याने 10 सामन्यात 4 शतकांसह 594 धावा केल्या आहेत.
चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा युवा क्रिकेटर रचिन रविंद्र असून त्याने 10 सामन्यांत 578 धावा केल्या.
पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचाच डॅरिल मिचेल असून त्याने 9 सामन्यांत 552 धावा केल्या आहेत.