ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा जगज्जेते

Pranali Kodre

अंतिम सामना

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 19 नोव्हेंबर रोजी पार पडला.

India vs Australia | World Cup 2023 Final | ICC

भारताचा पराभव

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्सने पराभव केला.

Australia won World Cup 2023 Final | ICC

ऑस्ट्रेलियाचा विश्वविजय

ऑस्ट्रेलियाने या विजयासह तब्बल सहाव्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे.

Australia won World Cup 2023 Final | ICC

ऑस्ट्रेलियाच्या जवळपासही कोणी नाही

ऑस्ट्रेलियाशिवाय अन्य कोणत्याही संघाला 2 पेक्षा जास्तवेळा अद्याप वनडे वर्ल्डकप जिंकता आलेला नाही.

Australia won World Cup 2023 Final | ICC

सहाव्यांदा कोरलं वर्ल्डकपवर नाव

ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपमध्ये आठ वेळा अंतिम सामना खेळला असून सहावेळा विजय मिळवण्याचा पराक्रम केला.

Australia won World Cup 2023 Final | ICC

ऑस्ट्रेलियाचे सहा विश्वविजय

ऑस्ट्रेलियाने 1975, 1987, 1996, 1999, 2003, 2007, 2015 आणि 2023 साली वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला आहे. यातील 1987, 1999, 2003, 2007, 2015 आणि 2023 साली ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला आहे.

Pat Cummins | ICC

पॅट कमिन्स

तसेच पॅट कमिन्स हा वनडे वर्ल्डकप जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा पाचवा कर्णधार ठरला.

Pat Cummins | ICC

विश्वविजेते ऑस्ट्रेलियन कर्णधार

यापूर्वी ऍलन बॉर्डर (1987), स्टीव्ह वॉ (1999), रिकी पाँटिंग (2003 आणि 2007) आणि मायकल क्लार्क (2015) यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला आहे.

Ricky Ponting | google image

World Cup फायनलमध्ये नेतृत्व करणारे भारतीय कर्णधार

Rohit Sharma
आणखी बघण्यासाठी