आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 3000 पेक्षा जास्त धावा करणारे 4 भारतीय

Pranali Kodre

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

Team India | BCCI

100 हून अधिक सामने

भारताच्या महिला आणि पुरुष संघाने आत्तापर्यंत प्रत्येकी 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.

India Women Cricket Team

3000 टी20 धावा करणारे खेळाडू

दरम्यान आत्तापर्यंत (8 जानेवारी 2024) पर्यंत महिला आणि पुरुष आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये चारच भारतीय क्रिकेटपटूंना 3000 धावांचा टप्पा ओलांडता आला आहे.

Harmanpreet Kaur Smriti Mandhana | X/ICC

विराट कोहली

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 115 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 52.73 च्या सरासरीने 4008 धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचा आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे.

Virat Kohli

रोहित शर्मा

रोहित शर्माने 148 आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये 4 शतके आणि 29 अर्धशतकांसह 3853 धावा केल्या आहेत.

Rohit Sharma

हरमनप्रीत कौर

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने आत्तापर्यंत 160 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 1 शतक आणि 11 अर्धशतकांसह 3201 धावा केल्या आहेत.

Harmanpreet Kaur | ICC

स्मृती मानधना

स्मृती मानधनाने आत्तापर्यंत 127 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 23 अर्धशतकांसह 3075 धावा केल्या आहेत.

Smriti Mandhana | X/ICC

केएल राहुल श्रेयस-शार्दूलसह घेतोय केपटाऊन सहलीचा आनंद

KL Rahul-Shreyas Iyer | Instagram
आणखी बघण्यासाठी