लेकानं वाढवल्या जो बायडन यांच्या अडचणी

Manish Jadhav

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

अमेरिकेत पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी जो बायडन यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. खरं तर, बायडन यांचे पुत्र हंटर बायडन यांना गुरुवारी रात्री उशिरा करचुकवेगिरीच्या अनेक प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले. हंटर बायडनवर $1.4 दशलक्ष कर चुकवल्याचा आरोप आहे.

America President Joe Biden | Dainik Gomantak

हंटर बायडन

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, सेंट्रल कॅलिफोर्नियातील यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टात हंटर बायडन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. यूएस जिल्हा न्यायालयात 56 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

Hunter Biden | Dainik Gomantak

आरोपपत्रात काय आहे?

विशेष वकील डेव्हिड वेस म्हणाले की, हंटर बायडन यांनी 2016 ते 2019 पर्यंत $1.4 दशलक्ष एवढा टॅक्स भरला नाही.

Hunter Biden | Dainik Gomantak

17 वर्षांचा तुरुंगास होऊ शकतो

बायडन यांच्यावर कर चुकवणे आणि खोटे टॅक्स रिटर्न भरणे अशा नऊ गुन्ह्यांचा आरोप आहे. आरोप सिद्ध झाल्यास, हंटर यांना 17 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल. न्याय विभागाने सांगितले की, बायडन यांच्याविरुद्धचा तपास सुरुच राहील.

Hunter Biden | Dainik Gomantak

लक्झरी लाइफ

हंटर बायडन यांनी 2016 ते 2020 या कालावधीत $7 दशलक्षपेक्षा जास्त कमाई केली. हा पैसा त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलसाठी वापरल्याचे नवीन आरोपात म्हटले आहे. हे पैसे ड्रग्ज, एस्कॉर्ट्स, गर्लफ्रेंड, लक्झरी हॉटेल्स आणि भाड्याने मिळणाऱ्या मालमत्ता, विदेशी कार, कपड्यांवर खर्च केले, परंतु कर भरला नाही.

Hunter Biden | Dainik Gomantak

रिपब्लिकन खासदारांची मागणी

अमेरिकन संसदेतील रिपब्लिकन खासदार जो बायडन यांची चौकशी आणि महाभियोगाची मागणी करत आहेत. बायडन यांनी आपल्या मुलासह एका मोठ्या प्लॅनतर्गंत निधीचा अपहार केल्याचा त्यांचा दावा आहे. तपासाला मंजुरी देण्यासाठी पुढील आठवड्यात सभागृहात मतदान होऊ शकते, असे बोलले जात आहे.

America President Joe Biden | Dainik Gomantak

पदाच्या गैरवापराबाबत कोणताही पुरावा नाही

आतापर्यंत, बायडन यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात किंवा उपराष्ट्रध्यक्षपदाच्या मागील कार्यकाळात त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही.

America President Joe Biden | Dainik Gomantak