Manish Jadhav
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध भयानक रुप धारण करत आहे. युद्धविरामानंतर इस्रायलने पुन्हा गाझावरील हल्ले तीव्र केले आहेत.
गाझामधील इस्रायली सैन्यांमध्ये गंभीर आजाराचा फैलाव होत आहे.
तज्ञ डॉक्टरांना दिलेल्या माहितीनुसार, या रोगाचं नाव 'शिगेला' (Shigella) आहे. संक्रमित इस्रायली सैन्यांना क्वारंटाईन करुन पुढील उपचारासाठी रुग्णालयांमध्ये पाठवले जात आहे.
असुता अशडोड विद्यापीठ रुग्णालयाचे डॉक्टर टाल ब्रोच यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायली सैन्यांमध्ये पोटाचे आजार वाढले आहेत.
या रोगाचा प्रसार संक्रमणातून होत आहे. युद्धाच्या ठिकाणी खराब स्थितीमुळे परिस्थिती बिघडत चालली आहे.
युद्धविराम संपताच इस्रायलने पुन्हा हल्ले सुरु केले. अवघ्या दोन दिवसांत 700 लोकांचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर गाझामधील कोणत्याही भागात राहणे आता सुरक्षित नसल्याचे एजन्सींचे म्हणणे आहे.
हमासच्या हल्ल्यापासून इस्रायल गाझामधील हमासच्या लक्ष्यांवर सातत्याने हल्ले करत आहे. गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात आतापर्यंत 17,170 हून लोकांचा मृत्यू झाला आहे.
युद्धविरामाच्या समाप्तीनंतर इस्रायली सुरक्षा दलांनी दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ला केला.