Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेची उपांत्य फेरी 15 आणि 16 नोव्हेंबर दरम्यान पार पडली.
उपांत्य फेरीत न्यूझीलंडला भारताविरुद्ध, तर दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्विकारावा लागला.
न्यूझीलंडने वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पराभूत होण्याची ही सातवी वेळ होती.
न्यूझीलंडने 1975, 1979, 1992, 1999, 2007, 2011 आणि 2023 या वर्षी झालेल्या वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत पराभव स्विकारला आहे.
सर्वाधिकवेळा वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांमध्ये न्यूझीलंडपाठोपाठ भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. या तिन्ही संघांनी प्रत्येकी 4 वेळा पराभव स्विकारला आहे.
भारतीय संघाने 1987, 1996, 2015 आणि 2019 या वर्षी वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पराभव स्विकारला आहे.
पाकिस्तानने 1979,1983,1987 आणि 2011 या वर्षी वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पराभव स्विकारला आहे.
दक्षिण आफ्रिकेला 1992, 2007 2015 आणि आता 2023 साली उपांत्य सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.