गोमन्तक डिजिटल टीम
समुद्र किनारे आणि डोंगर-झाडीशिवाय गोव्यात काही ठिकाणं अशीही आहेत जिथे जाताच भीतीचा थरार सुरु होतो. पैकी एक म्हणजे थ्री किंग्स चर्च, असं म्हणतात इथल्या राजाने सख्ख्या दोन भावांचा खून करून राज्य मिळवलं होतं. सूर्यास्तानंतर या चर्चवर लोकं कधीच थांबत नाही.
दोन भावांमध्ये प्रॉपर्टीवरून झालेल्या वादामुळे रॉड्रिग्ज होमचं चित्र कायमचं बदललं. एक दिवशी कडाक्याचं भांडण होऊन एका भावाने दुसऱ्या भावाचा खून केला आणि तेव्हापासून या घरातून किंकाळ्यांचा आवाज येतो असं म्हटलं जातं.
बोरीच्या पुलावरून जाताना अनेकांनी विचित्र आवाज आणि हालचालींचा अनुभव घेतला आहे. असं म्हणतात इथे काही लहान मुलांचा मृत्यू झाला होता. अनेकदा एक बाई पुलावरून पाण्यात उडी घेताना देखील लोकांनी पहिली आहे.
असं म्हणतात एका पोर्तुगीज सैनिकांची आत्मा इथून जाणाऱ्या माणसाला पछाडते. काही लोकांनी पूर्ण गणवेशात या सैनिकाला पहिले असल्याच्या देखील बातम्या आहेत.
दोना पावला बीच जरी एक सुंदर समुद्र किनारा म्हणून प्रसिद्ध असला तरीही याची दुसरी बाजू अत्यंत भीतीदायक आहे. असं म्हणतात इथे दोन प्रेमींनी आत्महत्या केली होती आणि त्यांनतर अजून इथे जाणाऱ्या लोकांना या प्रेमींचे आत्मे पाहायला, अनुभवायला मिळतात.
सांताक्रूझ-पणजीच्या रस्त्यावर चार खांबे पाहायला मिळतात. या रस्त्याचे नाव वसंतराव धेम्पो असे आहे आणि इथे पौर्णिमेच्या रात्री काही विचित्र घटना पाहायला मिळतात. या ठिकाणी अनेक अपघात देखील झाले असल्याने ही जागा शापित आहे असं म्हटलं जातं.