Sameer Amunekar
अफगाणिस्तानचा हा फिरकीपटू बॅटिंगमध्येही कमाल करतो, पण आयपीएलच्या इतिहासात तो सर्वाधिक १२ वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे.
'मॅड मॅक्स' म्हणून प्रसिद्ध असलेला ऑस्ट्रेलियाचा हा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू आयपीएलमध्ये १० वेळा पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे.
केकेआरचा हा हुकमी एक्का डावाची सुरुवात करताना अनेकदा वादळी फलंदाजी करतो, पण तो ८ वेळा गोल्डन डकचा शिकार ठरला आहे.
मुंबई इंडियन्सचा स्फोटक सलामीवीर ईशान किशन याच्या नावावरही हा नकोसा रेकॉर्ड आहे. तो आतापर्यंत ८ वेळा पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या 'किंग कोहली'लाही या यादीतून सुटता आलेले नाही. विराट ८ वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे.
आयपीएलचा उत्कृष्ट फिनिशर दिनेश कार्तिक याचाही या यादीत समावेश आहे. तो त्याच्या आयपीएल करिअरमध्ये ७ वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे.