Pranali Kodre
आयपीएल 2024 लिलाव
आयपीएल 2024 लिलावादरम्यान महागड्या क्रिकेटपटूंचे अनेक विक्रम मोडले.
आयपीएल 2024 लिलावात मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांच्या जोडगोळीसाठी मिळून तब्बल 45 कोटींपेक्षा अधिकची रक्कम खर्च करण्यात आली. त्यामुळे हे दोघे स्टार्क आणि कमिन्स आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू ठरले.
स्टार्कसाठी आयपीएल २०२४ लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी 24.75 कोटी रुपयांची बोली लावली. त्यामुळे तो आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
आयपीएल 2024 लिलावात कमिन्ससाठी सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपये मोजले. तो आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला.
सॅम करनला आयपीएल २०२३ लिलावात पंजाब किंग्सने 18.50 कोटी रुपयांना खरेदी केले होते, तो आयपीएल लिलावातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा क्रिकेटपटू आहे.
कॅमेरॉन ग्रीनला आयपीएल २०२३ लिलावात मुंबई इंडियन्सने 17.50 कोटीत खरेदी केले होते. तो आयपीएल लिलावातील चौथ्या क्रमांकाचा महागडा क्रिकेटपटू आहे.
बेन स्टोक्स आयपीएल लिलावातील संयुक्तरित्या पाचव्या क्रमांकाचा सर्वात महागडा क्रिकेटपटू आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२३ लिलावात 16.25 कोटींमध्ये खरेदी केले.
स्टोक्ससह या यादीत ख्रिस मॉरिसही पाचव्या क्रमांकावर आहे. त्याला आयपीएल 2021 लिलावात राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटीत खरेदी केले होते.
या यादीत सहाव्या क्रमांकावर युवराज सिंग आहे. त्याला आयपीएल 2015 साठी दिल्ली कॅपिटल्सने 16 कोटींना खरेदी केलेले.
युवराजसह निकोलस पूरनही या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. आयपीएल 2023 लिलावातच त्याला लखनऊ सुपर जायंट्सने 16 कोटीत खरेदी केले होते.
या यादीत पॅट कमिन्स सातव्या क्रमांकावरही असून त्याला आयपीएल 2020 लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने 15.50 कोटींना खरेदी केले होते.