Pranali Kodre
भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात गुरुवारी (11 जानेवारी) टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. मोहालीला पार पडलेल्या या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला.
असे असले तरी या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा शुन्य धावेवर धावबाद झाला.
त्यामुळे त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे. रोहित तब्बल 11 व्यांदा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शुन्यावर बाद झाला आहे.
रोहित भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्तवेळा शुन्यावर बाद होणारा क्रिकेटपटू आहे.
रोहितच्या पाठोपाठ या विक्रमाच्या यादीत केएल राहुल आहे. तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 5 वेळा शुन्यावर बाद झाला आहे.
तिसऱ्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदर असून तो 4 वेळा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शुन्यावर बाद झाला आहे.
श्रेयस अय्यर देखील 4 वेळा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शुन्यावर बाद झाला आहे.
विराट कोहली देखील आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4 वेळा शुन्यावर बाद झाला आहे.