Pranali Kodre
क्रिकेटमध्ये नेहमीच यष्टीरक्षकाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
यष्टीरक्षकाला नेहमीच स्टंपमागे उभे राहताना नेहमीच तत्पर राहावे लागते. कारण गोलंदाजाने टाकलेला चेंडू कधी त्याच्याकडे येईल आणि फलंदाज संधी निर्माण होईल, यावर लक्ष ठेवावे लागते.
यष्टीरक्षक यष्टीचीत करून किंवा झेल घेऊन किंवा धावबाद करून फलंदाजाला माघारी धाडू शकतो. यातील यष्टीचीत आणि झेल या विकेट्स त्याच्या नावावर जमा होतात.
आपण आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टंप मागे सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या पाच यष्टीरक्षकांबद्दल जाणून घेऊ.
दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज मार्क बाऊचर हे सर्वात यशस्वी यष्टीरक्षक असून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 596 डावात 998 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 952 झेल आणि 46 यष्टीचीतचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 485 डावात 905 विकेट्स घेतल्या. यामध्ये 813 झेल आणि 92 यष्टीचीतचा समावेश आहे.
भारताचा दिग्गज यष्टीरक्षक एमएस धोनी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 608 डावात 829 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात 634 झेल घेतलेत आणि 195 वेळा यष्टीचीत केले आहे.
श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू कुमार संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 499 डावात यष्टीरक्षण करताना 678 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 539 झेल घेतले आणि 139 यष्टीचीत केले आहेत.
ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक इयान हेली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 392 डावात 628 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 560 झेल आणि 68 यष्टीचीत केले आहेत.