Pranali Kodre
भारताची महान महिला क्रिकेटपटू मिताली राज 3 डिसेंबर रोजी तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.
तिला भारतातीलच नाही, जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते.
तिने तिच्या कारकिर्दीत 12 कसोटी सामने खेळले असून 1 शतक आणि 4 अर्धशतकासह 699 धावा केल्या आहेत. तसेच वनडेत तिने 232 सामन्यांत 7 शतकांसह 7805 धावा केल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 89 सामन्यांत 2364 धावा आहेत.
मिताली महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी क्रिकेटपटू आहे. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तिच्या व्यतिरिक्त महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा केवळ शारलोट एडवर्ड्सने केल्या आहेत.
मिताली महिला वनडे क्रिकेटमध्येही सर्वाधिक धावा (7805) करणारी क्रिकेटपटू आहे.
त्याचबरोबर ती वनडेत सर्वाधिक सामने (232) खेळणारी महिला क्रिकेटपटू आहे. तिच्याव्यतिरिक्त केवळ झुलन गोस्वामीने 200 हुन अधिक वनडे सामने खेळले आहेत.
मितालीने कसोटी क्रिकेटमध्ये 214 धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. विशेष म्हणजे महिला कसोटीत ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम खेळी आहे. मितालीने ही खेळी इंग्लंडविरुद्ध टँटन येथे केली होती.
कर्णधार म्हणूनही मितालीने मोठे विक्रम केले आहेत. तिने 155 वनडे सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून तिने यात 89 विजय मिळवले आहेत. त्यामुळे ती महिला वनडेत सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारी आणि विजय मिळवणारी कर्णधार आहे.
तिने महिला वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 28 सामन्यांत नेतृत्व केले आहे.