Pranali Kodre
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना सेंच्युरियनला 26 डिसेंबर 2023 रोजी सुरु झाला आहे.
या सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने भारतीय फलंदाजांना चांगलेच सतावले.
रबाडाने या डावात भारताचा कर्णधार रोहित शर्मालाही 5 धावांवर बाद केले. त्यामुळे रबाडा रोहित शर्माविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाजही ठरला.
रबाडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितला बाद करण्याची ही 28 सामन्यांमधील 13 वी वेळ होती. त्यामुळे रबाडा रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा बाद करणारा गोलंदाज ठरला आहे.
रबाडानंतर टीम साऊदीने रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 32 सामन्यांमध्ये 12 वेळा बाद केले आहे.
तसेच रबाडाने रोहितला कसोटीत 7 सामन्यांमध्ये 6 वेळा बाद केले आहे.
रबाडा कसोटीत नॅथन लायननंतर रोहितला सर्वाधिकवेळा बाद करणारा गोलंदाज आहे.
लायनने 9 वेळा कसोटीत रोहितला बाद केले आहे.