Manish Jadhav
रेल्वेने प्रवास करण्यात जी मज्जा येते ती विमान आणि इतर साधनात येत नाहीच. भारतात असे अनेक रेल्वेमार्ग आहेत ज्यामुळे आपल्याला समुद्र आणि नद्यांचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते.
तुम्ही भारत दर्शनचा प्लॅन करत असाल आणि तोही खासकरुन ट्रेनने असेल तर तुम्ही 'या' चार रेल्वे रुटवरुन नक्की प्रवास केला पाहिजे. तुम्ही मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही.
मंडपम ते रामेश्वरम हा रेल्वेमार्ग भारतातील सर्वात सुंदर रेल्वेमार्ग पैकी एक आहे. हा रेल्वेमार्ग देशातील सर्वात लांब रेकवेब्रिज पैकी एक आहे ज्याला 'पम्बन ब्रीज' असे म्हटले जाते.
हा रेल्वेमार्ग गोव्यातील वास्को द गामा येथून सुरु होऊन कर्नाटकातील लोंडा पर्यंत जातो. या रेल्वे प्रवासात तम्हाला पश्चिम घाटाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
भुवनेश्वर ते ब्रह्मपुर हा रेल्वेमार्ग एक वेगळेच दृश्य दाखवतो. या प्रवासात तुम्हाला पूर्व घाट आणि ओडिशातील चिल्का सरोवराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
कोकण रेल्वेचा मुंबई ते गोवा हा सर्वात सुंदर रेल्वेमार्ग आहे. या रेल्वेमार्गने सह्याद्रीतील डोंगररांगा आणि अरब सागरातील सुंदर दृश्य पाहायला मिळतात.