Pranali Kodre
साल 2023 वर्षे संपत असून या वर्षातील टेनिस खेळातील हंगामही आता संपला आहे.
त्यामुळे यंदाच्या सर्वाधिकवेळा विजेतेपदाची ट्रॉफी उंचावरणाऱ्या टेनिसपटूंची नावेही निश्चित झाली आहे.
2023 वर्षात देखील सार्बियाच्या नोवाक जोकोविचचे वर्चस्व राहिल्याचे दिसले. त्याने यंदा सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचाही पराक्रम केला.
जोकोविचने 2023 वर्षात तब्बल 7 विजेतेपदं जिंकली. यामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपन या ग्रँडस्लॅमचा समावेश आहे, तर ऍडलेड, सिनसिनाटी, पॅरिस आणि एटीपी फायनल्स या स्पर्धांमध्येही त्याने विजेतेपद जिंकले.
जोकोविचला 2023 वर्षांत कडवी झुंज दिली ती कार्लोस अल्कारेजने. युवा अल्कारेजने 2023 मध्ये विम्बल्डनचे विजेतेपद जिंकण्यासह एकूण 6 विजेतीपदं पटकावली. त्याने ब्युनोस एअर्स, इंडियन वेल्स, बार्सिलोना, मद्रिद आणि क्विन्स ही विजेतीपदेही जिंकली.
साल 2023 मध्ये सर्वाधिकवेळा विजेतेपदाची ट्रॉफी उंचावणाऱ्या पुरुष टेनिसपटूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर डॅनिल मेदवेदेव आहे. त्याने रोटेनडॅम, दोहा, दुबई, मियामी आणि रोम अशा पाच स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले.
या यादीत चौथ्या क्रमांकावर जॅनिक सिन्नर असून त्याने 4 विजेतेपद जिंकले आहेत. त्याने माँटेपिलर, टोरंटो, बिजिंग आणि विएन्ना येखे विजेतेपद जिंकले.