Sameer Panditrao
आपल्या आसपास भिरभिरणारे डास नेमके काय खातात माहीत आहे का?
ही माहिती वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
नर डास माणसांना चावत नाहीत.ते फक्त फुलांचा मध, वनस्पतींमधील रस आणि गोड द्रव खातात.
मादी डास मात्र वेगळ्या स्वभावाच्या असतात.अंड्यांच्या वाढीसाठी त्यांना प्रथिनांची गरज असते.
मादी डास माणसं किंवा प्राणी चावून रक्त शोषतात. या रक्तातून मिळालेल्या प्रथिनांमुळे अंडी तयार होतात.
फक्त रक्तच नव्हे! मादी डासही फुलांचा मध, रस, गोड द्रव खातात.
बहुतेक मादी डास संध्याकाळी आणि रात्री सक्रिय असतात. म्हणूनच या वेळी डास चावण्याचा त्रास जास्त जाणवतो.