Sameer Amunekar
घराभोवती, कुंड्यांमध्ये किंवा टायरमध्ये पावसाचे पाणी साचून राहू देऊ नका. साचलेले पाणी हे डासांच्या पैदाशीचे मुख्य ठिकाण आहे.
घरातील खिडक्या आणि दरवाजांना बारीक जाळ्या (Mosquito Nets) बसवा. यामुळे डास घरात प्रवेश करणार नाहीत आणि खेळती हवाही मिळेल.
खिडकीत किंवा बाल्कनीत तुळस, लेमनग्रास किंवा पुदिन्याची रोपे लावा. या वनस्पतींचा सुगंध नैसर्गिकरित्या डासांना दूर ठेवण्यास मदत करतो.
दिवसा किंवा संध्याकाळी कडुलिंबाच्या तेलाचा (Neem Oil) दिवा लावा किंवा ते त्वचेला लावा. हे एक उत्तम नैसर्गिक 'मॉस्किटो रिपेलेंट' म्हणून काम करते.
घरात डास मारणारी कॉइल्स, लिक्विड वेपोरायझर्स किंवा मच्छरदाणी (Mosquito Net) यांचा वापर करा, विशेषतः झोपताना लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी मच्छरदाणी अत्यंत प्रभावी ठरते.
पावसाळ्यात घरात ओलावा जास्त असतो, ज्यामुळे डास आकर्षित होतात. शक्य असल्यास घराचे कोपरे आणि फळ्या कोरड्या ठेवा आणि एअर प्युरिफायरचा वापर करा.
संध्याकाळच्या वेळी बाहेर पडताना शक्यतो पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. यामुळे त्वचेचा भाग उघडा राहत नाही आणि डास चावण्यापासून बचाव होतो.