Manish Jadhav
मूगमध्ये प्रथिने आणि कॉम्प्लेक्स कर्बोदके असल्याने, सकाळी खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा आणि स्फूर्ती टिकून राहते.
नाश्त्यात मूग समाविष्ट केल्याने चयापचय क्रिया (Metabolism) वाढते, ज्यामुळे वजन नियंत्रणात मदत होते.
मूग हे प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहेत. सकाळी मूग खाल्ल्यास स्नायूंना लवकर पोषण मिळते आणि त्यांची झीज भरुन निघते.
दिवसा सक्रिय असताना मूगातील फायबरमुळे पचनक्रिया (Digestion) सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठता दूर होते.
मूग पचायला थोडा जड असतो. रात्री उशिरा खाल्ल्यास पचनसंस्थेवर ताण येतो.
डाळवर्गीय पदार्थ असल्याने रात्री मूग खाल्ल्यास गॅस, अपचन आणि पोट फुगण्याची (Bloating) समस्या वाढू शकते.
पचनाच्या समस्येमुळे रात्री अस्वस्थता निर्माण होते आणि त्यामुळे शांत झोप लागण्यास अडथळा निर्माण होतो.
जर तुम्हाला रात्री मूग खायचे असतीलच, तर मोड आलेले मूग (Sprouts) साध्या मुगापेक्षा पचायला सोपे आणि अधिक फायदेशीर ठरतात.