Workout Tips: सकाळी की संध्याकाळी? व्यायामाची परफेक्ट वेळ, जाणून घ्या

दैनिक गोमन्तक डिजिटल

रात्री उशिरा तीव्र व्यायाम टाळा

रात्री झोपण्यापूर्वी अगदी २ तास आधी खूप भारी किंवा हेवी व्यायाम करू नये. यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि रात्री शांत झोप लागण्यास अडचण येऊ शकते.

Workout Tips | Dainik Gomantak

सकाळच्या व्यायामाचा फायदा: चरबी जलद वितळते

सकाळी रिकाम्या पोटी (Fastes State) व्यायाम केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी (Fat) लवकर वितळण्यास मदत होते, जे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Workout Tips | Dainik Gomantak

ऊर्जा आणि मूड फ्रेश राहतो

सकाळी वर्कआऊट केल्याने शरीरात 'एन्डॉर्फिन' (Endorphins) नावाचे हॅपी हार्मोन्स तयार होतात. यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते आणि मूड दिवसभर फ्रेश राहतो.

Workout Tips | Dainik Gomantak

कडक शिस्त आणि सातत्य

सकाळच्या वेळी इतर कोणतीही कामे आडवी येत नाहीत. त्यामुळे सकाळी व्यायाम करण्याची सवय ठरवली की त्यात खंड पडण्याची शक्यता खूप कमी असते.

Workout Tips | Dainik Gomantak

संध्याकाळच्या व्यायामाचा फायदा: ताकद आणि स्टॅमिना जास्त

दुपारनंतर किंवा संध्याकाळी आपल्या शरीराचे तापमान आणि स्नायू जास्त लवचिक असतात. त्यामुळे संध्याकाळी जड वजन उचलणे (Weight Lifting) किंवा कठीण व्यायाम करणे सोपे जाते.

Workout Tips | Dainik Gomantak

दुखापतीचा धोका कमी

सकाळी उठल्यावर शरीर थोडे कडक (Stiff) असते. त्याउलट, संध्याकाळपर्यंत शरीर पूर्णपणे ॲक्टिव्ह झालेले असल्याने स्नायू दुखावण्याचा किंवा लचकण्याचा धोका कमी असतो.

Workout Tips | Dainik Gomantak

दिवसभराचा मानसिक ताण हलका होतो

ऑफिस किंवा कामावरून आल्यानंतर संध्याकाळी व्यायाम केल्याने दिवसभराचा मानसिक ताण (Stress) आणि थकवा निघून जाण्यास मदत होते.

Workout Tips | Dainik Gomantak

'या' 8 भारी AI टूल्सचा वापर करून बना स्मार्ट वर्कर

Best AI tools | Dainik Gomantak
येथे क्लिक करा