Best AI tools: कामाचा वेग वाढवा! 'या' 8 भारी AI टूल्सचा वापर करून बना स्मार्ट वर्कर

दैनिक गोमन्तक डिजिटल

Gamma AI पीपीटी आणि पीडीएफ मिनिटांत

कसे वापरावे? फक्त एका ओळीचा प्रॉम्प्ट द्या आणि Gamma AI तुम्हाला काही सेकंदांत संपूर्ण प्रेझेंटेशन (PPT), पीडीएफ दस्तऐवज किंवा अगदी वेबपेज तयार करून देईल. डिझाईन आणि मांडणीचे काम हे टूल स्वतः करते.

Best AI tools | Dainik Gomantak

Gemini भाषांतर, रिसर्च आणि आयडियाजचा बादशाह

कसे वापरावे? बातम्यांचे अचूक मराठी भाषांतर करणे, नवीन लेखांसाठी कल्पक आयडिया शोधणे किंवा सोशल मीडियासाठी झटपट स्क्रिप्ट लिहिणे यासाठी Gemini हे सर्वोत्तम टूल आहे.

Best AI tools | Dainik Gomantak

Midjourney / Canva AI आकर्षक इमेजेस आणि थंबनेल्स

कसे वापरावे? बातम्यांसाठी किंवा सोशल मीडिया पोस्टसाठी लागणारे एचडी आणि युनिक फोटो तयार करण्यासाठी Midjourney किंवा Canva AI वापरा. यात बॅकग्राउंड बदलणे किंवा टेक्स्ट इमेजमध्ये रूपांतरित करणे अत्यंत सोपे आहे.

Best AI tools | Dainik Gomantak

ChatPDF / Humata तासांचे सरकारी रिपोर्ट ५ मिनिटांत

कसे वापरावे? पानांच्या पानांचे कठीण अहवाल (PDFs) वाचण्याची गरज नाही. ती पीडीएफ ChatPDF किंवा Humata AI वर अपलोड करा आणि त्याला मराठीत प्रश्न विचारून हवी ती माहिती काही सेकंदांत मिळवा.

Best AI tools | Dainik Gomantak

ElevenLabs प्रोफेशनल व्हॉईसओव्हर एका क्लिकवर

कसे वापरावे? तुमच्या व्हिडिओसाठी जर स्वतःचा आवाज रेकॉर्ड करायचा नसेल, तर ElevenLabs हे सर्वोत्कृष्ट टूल आहे. यात लिहिलेला मजकूर अगदी माणसासारख्या हुबेहूब आणि स्पष्ट आवाजात (मराठीसह) ऑडिओमध्ये बदलता येतो.

Best AI tools | Dainik Gomantak

Opus Clip लांब व्हिडिओमधून एका क्लिकवर शॉर्ट्स/रील्स

कसे वापरावे? तुमचा कोणताही मोठा व्हिडिओ Opus Clip वर अपलोड करा. हे टूल त्या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचे आणि व्हायरल होणारे भाग शोधून, त्याला आकर्षक कॅप्शन्स (Subtitles) जोडून त्याचे छोटे-छोटे रील्स बनवून देते.

Best AI tools | Dainik Gomantak

QuillBot / Grammarly इंग्रजी लिखाणाची अचूकता

कसे वापरावे? इंग्रजी कंटेंट लिहिता किंवा स्थानिक भाषेतून इंग्रजीत भाषांतर करताना होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी Grammarly वापरा. तसेच एखाद्या वाक्याची रचना अधिक प्रभावी करण्यासाठी QuillBot चे 'रीफ्रेज' फिचर वापरा.

Best AI tools | Dainik Gomantak

Notion AI कामाचे प्लॅनिंग आणि डेटा मॅनेजमेंट

कसे वापरावे? रोजच्या कामांची यादी बनवणे, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सचा ट्रॅक ठेवणे आणि महत्त्वाच्या नोट्स व्यवस्थित स्टोअर करण्यासाठी Notion AI चा वापर करा. हे तुमचे वैयक्तिक डिजिटल असिस्टंट म्हणून काम करेल.

Best AI tools | Dainik Gomantak

शरीराला आतून मजबूत बनवणाऱ्या 'या' 7 टिप्स नक्की फॉलो करा

Monsoon Health Care | Dainik Gomantak
येथे क्लिक करा