Sameer Panditrao
उष्णता आणि UV किरणांपासून बचाव करणे महत्त्वाचे आहे.
बाहेर पडण्याच्या १५-२० मिनिटे आधी SPF ३० किंवा त्याहून अधिक असलेली सनस्क्रीन लावा.
टोपी, गॉगल्स आणि संपूर्ण शरीर झाकणारे हलके कपडे घाला.
भरपूर पाणी प्या आणि मॉइश्चरायझर वापरा जेणेकरून त्वचा कोरडी पडणार नाही.
व्हिटॅमिन C आणि E युक्त पदार्थ जसे संत्री, बदाम आणि टोमॅटो खा.
१० ते ४ या वेळेत सूर्यप्रकाश तीव्र असतो, शक्यतो सावलीत राहा.
सूर्यामुळे डाग किंवा त्वचेच्या समस्या दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.