Sameer Amunekar
सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (Toxins) बाहेर पडतात आणि त्वचा आतून हायड्रेट होते.
सकाळी फक्त थंड किंवा साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्याची सूज (Puffiness) कमी होते, रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा ताजी तवाने दिसते.
रोज सकाळी किमान १५-२० मिनिटे प्राणायाम, योगा किंवा हलका व्यायाम करा. घाम आल्यामुळे त्वचेची छिद्रे (Pores) स्वच्छ होतात आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.
चेहरा धुतल्यानंतर त्वचेनुसार हलके मॉइश्चरायझर लावा. तुम्ही घरातच असणार असाल, तरीही सूर्याच्या यूव्ही (UV) किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावणे विसरू नका.
सकाळच्या नाश्त्यामध्ये हंगामी फळे, सुका मेवा, मोड आलेली कडधान्ये किंवा ज्यूसचा समावेश करा. व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त आहार त्वचेला चमकदार बनवतो.
सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे टाळा. त्याऐवजी ग्रीन टी किंवा लिंबू-मध पाणी प्या. यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे वृद्धत्व (Aging) रोखण्यास मदत करतात.
सकाळी चेहऱ्याला बर्फाच्या तुकड्याने किंवा जेड रोलरने (Jade Roller) हलका मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढून त्वचा घट्ट आणि चमकदार बनते.