Manish Jadhav
उन्हाळ्याच्या दिवसात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
अशातच रिकाम्या पोटी पाणी पिणे हे एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
सकाळी कोमट पाणी किंवा साध पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
पण सकाळी उठल्यावर तुम्ही जर काही न खाता सर्वात आधी रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी पाणी प्याल तेव्हा ते खूप थंड किंवा खूप गरम नसावे.
रिकाम्या पोटी जास्त पाणी प्यायल्याने तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो.