Sameer Panditrao
सकाळी फळे खाणे आरोग्यासाठी चांगले असते, पण सर्व फळे उपाशीपोटी खाणे योग्य नसते. काही फळांमुळे पोटाला त्रास होऊ शकतो.
केळी उपाशीपोटी खाल्ल्यास गॅस, आळस, पोट जड वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात.
आंबट फळे उपाशीपोटी खाल्ल्यास आम्लपित्त, पोटात दुखणे होऊ शकते.
अननसात नैसर्गिक आम्ल जास्त असते. उपाशीपोटी खाल्ल्यास जळजळ होण्याची शक्यता असते.
टरबूज हलके वाटते, पण उपाशीपोटी खाल्ल्यास पोट फुगणे, जुलाब यासारखा त्रास होऊ शकतो.
पपई उपाशीपोटी खाल्ल्यास काहींना पोट साफ होण्याचा त्रास, मळमळ जाणवू शकते.
उपाशीपोटी खाण्यास योग्य पर्याय- भिजवलेले बदाम, सफरचंद, नाशपाती