Mont Music Festival: विविध कलांचा आविष्कार, माँत संगीत महोत्सव

Sameer Panditrao

माँत संगीत महोत्सव

गोव्यातील एका निसर्गरम्य टेकडीवर दरवर्षी होणारा माँत संगीत महोत्सव यंदा झाला. विविध कलांचा अाविष्कार उपस्थितांना अनुभवता आला. 

Mont Music Festival Goa | Dainik Gomantak

नृत्य

ओडिसी आणि भरतनाट्यम यांचा समन्वय करत राहुल आणि मिताली यांनी वारसा आणि समकालीन यांचा संगम साधत दोन्ही नृत्यपरंपरांचा अविष्कार मोहकपणे सादर केला. 

Mont Music Festival Goa | Dainik Gomantak

चेंजिंग होरायझन्स

ईशान्य भारतातील एओ नागा कॉयर ग्रुपने चेंजिंग होरायझन्स या आपल्या कार्यक्रमाद्वारे ईशान्य भारतातील सांस्कृतिक परंपरेत रुजलेले गायन सादर केले.

Mont Music Festival Goa | Dainik Gomantak

फादो

समकालीन ‘फादो’ गायन शैलीमध्ये रिकार्डो रिबेरो यांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते. त्यांनीही या महोत्सवात आपल्या भारदार आवाजाने उपस्थितांना मोहविले.

Mont Music Festival Goa | Dainik Gomantak

वाद्यवृंद

पेरेडेस स्टुटी कोरल आणि स्ट्रिंग एन्सेंबल या दोन्ही ग्रुपनी मिळून, पोर्तुगीज गिटारचे ज्यांना राजदूत मानले जाते अशा कार्लोस पेरेडस यांच्या शताब्दीच्या निमित्ताने वाद्यवृंद सादर केला.

Mont Music Festival Goa | Dainik Gomantak

गीते

पहिल्या दिवशी कार्यक्रमात सोनिया शिरसाट यांनी कोकणी आणि पोर्तुगीज भाषांमध्ये गीते सादर केली. संगीतकारांनी तिला साथ दिली.

Mont Music Festival Goa | Dainik Gomantak

रूट्स

ग्रॅमी-पुरस्कृत विख्यात सतार वादक असद खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘रूट्स’ या कार्यक्रमात लोकपरंपरेतील संगीताचा आस्वाद या महोत्सवात घेता आला. 

Mont Music Festival Goa | Dainik Gomantak

दिल चाहता है... मग 'व्हॅलेंटाईन डे' करा गोव्यात साजरा

Valentine Day In Goa