Monsoon Travel Tips: पावसाळी ट्रिपचे प्लॅनिंग करताय? 'या' टिप्स लक्षात ठेवा

Sameer Amunekar

ठिकाण

पावसाळ्यात भूस्खलन किंवा पुराचा धोका नसलेली ठिकाणं निवडा. कोकण, माथेरान, महाबळेश्वर, भंडारदरा, गगनबावडा, ताम्हिणी घाट यांसारखी ठिकाणं खास पावसाळ्यासाठी योग्य आहेत.

Monsoon Travel Tips | Dainik Gomantak

वॉटरप्रूफ बॅग कव्हर

चांगल्या प्रतीची रेनकोट, छत्री, वॉटरप्रूफ बॅग कव्हर असणं अत्यावश्यक आहे. मोबाइल, कॅमेरा आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी झिप लॉक पाउचेस वापरा.

Monsoon Travel Tips | Dainik Gomantak

फुटवेअर

पाय मोकळे राहतील आणि चिखलात अडकणार नाहीत अशी ग्रिप असलेली सँडल किंवा ट्रेकिंग शूज वापरा.

Monsoon Travel Tips | Dainik Gomantak

औषधांचा कीट

सर्दी, खोकला, जंतूसंसर्ग, अंगदुखी अशा लहानसहान आजारांसाठी औषधं जवळ ठेवा. डायजेस्टिव टॅबलेट्स, बँडेज, डेटॉल व wipes घेऊन जा.

Monsoon Travel Tips | Dainik Gomantak

हवामानाचा अंदाज घ्या

प्रवासापूर्वी हवामानाचा अंदाज पहा. जोरदार पावसाच्या वेळी फारसे प्रवास टाळावेत.

Monsoon Travel Tips | Dainik Gomantak

गुगल मॅप्स

काही भागांत नेटवर्क नसतं. त्यामुळे ऑफलाइन गुगल मॅप्स डाउनलोड करून ठेवा.

Monsoon Travel Tips | Dainik Gomantak
Kidney Health Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा