Sameer Amunekar
पावसाळ्यात घराच्या आसपास गवत, झुडपे किंवा कचऱ्याचे ढिगारे वाढू देऊ नका. सापांना लपण्यासाठी अशा जागा खूप आवडतात, त्यामुळे परिसर नेहमी साफ ठेवा.
घरात किंवा परिसरात उंदीर आणि बेडूक असल्यास सापांचे प्रमाण वाढते, कारण हे सापांचे मुख्य अन्न आहे. घराची स्वच्छता राखून उंदरांचा उपद्रव थांबवा.
घराच्या भिंतींना किंवा पायाला असलेल्या फटी, भेगा किंवा उघडी गटारे सिमेंटने बंद करा. सापांना अशा बंदिस्त आणि थंड जागी निवारा शोधणे सोपे जाते.
घराभोवती पाणी साचू देऊ नका. साचलेले पाणी सापांना आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांना आकर्षित करते. पाण्याचा निचरा योग्य असल्याची खात्री करा.
पावसाळ्यात संध्याकाळच्या वेळी सापांची हालचाल जास्त असते. त्यामुळे घराच्या आसपास चालताना टॉर्चचा वापर करा आणि पाय पूर्ण झाकले जातील असे बूट वापरा.
घराच्या मुख्य दरवाजाच्या खालची फटी (Gap) बंद करण्यासाठी रबर स्ट्रिप्स किंवा 'डोअर सील' लावा. यामुळे साप सहजपणे घरात प्रवेश करू शकणार नाहीत.
चुकूनही सापाला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका. साप दिसल्यास सुरक्षित अंतरावर राहा, त्याच्यावर सतत नजर ठेवा आणि तातडीने जवळच्या सर्पमित्राला (Snake Catcher) संपर्क करा.