Sameer Amunekar
पावसाळ्यात साप घरात येण्याची शक्यता वाढते, कारण त्यांना कोरडे, सुरक्षित आश्रय हवा असतो. जर तुम्हाला साप घरात शिरण्याची भीती वाटत असेल, तर काही विशिष्ट झाडं तुमच्या आजूबाजूला लावल्यास साप दूर राहण्यास मदत होऊ शकते.
तुळस सापांना सहसा नकोशी असते. तिचा वास आणि औषधी गुणधर्म सापांना परावृत्त करतात.
गवती चहाचा तीव्र सुगंध सापांना आवडत नाही. यामध्ये "सिट्रोनेला" नावाचा घटक असतो जो साप आणि मच्छर दोघांनाही दूर ठेवतो.
नावाप्रमाणेच हे झाड सापांना दूर ठेवण्यासाठी ओळखले जाते.
घराच्या आजूबाजूला गवत व झुडपे छाटून टाका. ओलसर व अंधारी ठिकाणी स्वच्छता ठेवा.
दरवाजे, खिडक्या यामध्ये जाळं बसवा. दरवाज्याजवळ लसूण किंवा कापलेला कांदा ठेवा यामुळं साप घरात शिरण्याची शक्यता कमी असते.