Monsoon Care Tips: पावसात फोन भिजल्यास काय करावे? 'या' 7 सोप्या ट्रिक्सने वाचवा हजारो रुपये

दैनिक गोमन्तक डिजिटल

वॉटरप्रूफ पाऊचचा वापर करा

पावसाळ्यात बाहेर पडताना फोन नेहमी चांगल्या दर्जाच्या झिप-लॉक किंवा वॉटरप्रूफ पाऊचमध्येच ठेवा.

Monsoon Care Tips | Dainik Gomantak

ओल्या हातांनी फोन वापरणे टाळा

हात ओले असताना किंवा पावसात भिजल्यावर लगेच फोनला हात लावू नका. यामुळे चार्जिंग पोर्ट किंवा स्पीकर्समध्ये पाणी जाऊ शकते.

Monsoon Care Tips | Dainik Gomantak

ओला फोन कधीही चार्ज करू नका

फोनवर पाण्याचे थेंब असल्यास किंवा फोन ओला झाला असल्यास तो लगेच चार्जिंगला लावू नका; शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो.

Monsoon Care Tips | Dainik Gomantak

ब्लूटूथ इयरफोन्सचा वापर करा

पावसात फोन खिशात किंवा बॅगेत सुरक्षित ठेवून बोलण्यासाठी ब्लूटूथ/वायरलेस इयरफोन्सचा वापर करणे सोयीचे ठरते.

Monsoon Care Tips | Dainik Gomantak

रायझिंग/सिलिका जेल पॅकेट्सचा वापर

फोन बॅगेत ठेवत असाल तर बॅगेत २-३ सिलिका जेलची पाकिटे (Silica Gel Packets) ठेवा. ती हवेतील दमटपणा (Moisture) शोषून घेतात.

Monsoon Care Tips | Dainik Gomantak

फोन भिजल्यास लगेच 'स्विच ऑफ' करा

फोन पावसात भिजल्यास तो लगेच बंद करा. हेअर ड्रायरने फोन सुकवण्याची चूक करू नका, त्याने अंतर्गत पार्टसना इजा पोहोचू शकते.

Monsoon Care Tips | Dainik Gomantak

तांदळात फोन ठेवण्याऐवजी कोरड्या जागी ठेवा

फोन भिजल्यास तो तांदळात ठेवण्याऐवजी कॉटनच्या कपड्याने पुसून पंख्याखाली किंवा हवेशीर-कोरड्या जागी नैसर्गिकरित्या वाळू द्या.

Monsoon Care Tips | Dainik Gomantak

पोळ्या राहतील अनेक तास मऊ 'या' सोप्या टिप्स फॉलो करा

Soft Roti Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा