दैनिक गोमन्तक डिजिटल
पोळी तव्यावरून काढल्यावर लगेच तूप किंवा लोणी लावा. त्यानंतर सुती (Cotton) कपड्यात गुंडाळून बंद कॅसरोल/हॉटपॉटमध्ये ठेवा, जेणेकरून वाफेने पोळ्या तासनतास मऊ राहतील.
पीठ भिजवताना नेहमी कोमट पाणी किंवा थोडे कोमट दूध वापरा. यामुळे पिठातील ग्लुटेन व्यवस्थित सक्रिय होते आणि पोळ्या मऊ होतात.
पीठ मळताना त्यात अर्धा चमचा तेल किंवा तूप आणि थोडे मीठ घाला. यामुळे पीठाला छान मऊपणा येतो आणि पोळी कोरडी पडत नाही.
पीठ मळून झाल्यावर ते लगेच लाटू नका. ओल्या सुती कपड्याने किंवा झाकणाने पीठ १५-२० मिनिटे झाकून ठेवा. यामुळे पीठ छान मुरते.
पीठ जेवढे जास्त आणि व्यवस्थित मळले जाईल, तेवढ्या पोळ्या मऊ आणि टम्म फुगतात. मळताना पीठावर पाण्याचा हपका मारून पुन्हा २ मिनिटे मळून घ्या.
पोळी लाटताना खूप जास्त कोरडे पीठ वापरणे टाळा. जास्त कोरड्या पिठाने तव्यावर पोळी भाजताना ती कडक आणि कोरडी होते.
तवा खूप जास्त तापलेला किंवा एकदम थंड नसावा. मध्यम ते उच्च आचेवर (Medium to High Flame) पोळी पटकन भाजा. मंद आचेवर भाजल्यास पोळी चामट/कडक होते.